रस्ता केल्यानंतर त्यावर कंत्राटदाराचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरचे फलक लावण्याची मागणी 

kolhapur people comment on road condition
kolhapur people comment on road condition
Updated on

कोल्हापूर : जो कंत्राटदार कोल्हापूर शहरातील रस्ते करणार आहे, त्या कंत्राटदाराचे नाव, पत्ता व मोबाईल नंबरचे पक्के फलक रस्त्यावर लावले पाहिजेत. रस्त्याचा दर्जा तपासणारी प्रामाणिक यंत्रणा ठेवली पाहिजे. जे कंत्रटदार किंवा ठेकेदार आहेत, त्यांच्याकडून त्याने केलेल्या रस्त्यासाठी पाच वर्षाच्या हमीचा करार करुन घेतला पाहिजे. प्रामाणिक पणे रस्ते केले तर अनेक वर्षही टिकतील. तर, खराब झालेल्या रस्त्यांचा जाब लोकांनीच विचारला पाहिजे आणि रस्त्याच्या कामात तडजोड नको, अशा सडेतोड प्रतिक्रिया कोल्हापूर वासियांनी दिल्या आहेत. 

कोल्हापूर शहरातील रस्ते करण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. रस्ते करताना सर्वात महत्वाचा घटक असतणारे डांबर दर्जेदार आणि शासकीय रिफायनरीतून आलेलेच असावे. निकृष्ट दर्जाच्या डांबरामुळे चार-पाच महिन्यातच रस्त्याची चाळणं होते. हा आजवरचा शहरवासियांचा अनुभव आहे. यापार्श्‍वभूमीवर आज "सकाळ'मधून प्रसिध्द झालेल्या "निकृष्ट डांबराने रस्त्याला काळिमा' या वृत्तानंतर सोशल मीडियावर लोकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

कोल्हापूर शहरासाठी 40 कोटी रुपयांच्या निधीतून दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते झालेच पाहिजे. कोणत्या तरी कंत्राटदार टक्केवारी मिळावी म्हणून निकृष्ट दर्जाचे रस्ते करत असेल तर त्याला पायबंद घातला पाहिजे. शहरातील संपूर्ण रस्त्यांची चाळण झाली आहे. कोरोनाच्या कठीण काळात ही शहरातील रस्ते करण्यासाठी निधी मिळाला आहे. रस्त्यावरून जाताना लोकांचे हाल होत आहेत. दुचाकी, रिक्षा चालक, चारचाकीसह अवजड वाहनांची रहदारी धोकादायक आणि त्रासदायक ठरत आहे. नागरिकही शहरातील रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ झाले पाहिजेत अशी मागणी करत आहेत. 

शहरातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, हे रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ होण्यासाठी कोणतीही कसर सोडली जावू नये. यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी दर्जेदार रस्त्यांसाठी स्व:ता लक्ष घालावे, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिल्या आहेत. कोरोनाच्या कठीण काळातही कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपये मंजूर झाले आहेत. शहरातील रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ झाले पाहिजेत. यात शंका नाही. यासाठी स्वत आयुक्तांनी लक्ष घालून या रस्त्यांचे नियोजन केले पाहिजे.  

  
 कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी लोकांची अपेक्षा : 
- जो रस्ता तयार केला, त्या रस्त्याच्या ठेकेदाराच्या नावचा फलक संबंधित रस्त्यावर उभारला पाहिजे. 
- रस्त्याच्या टेंडरची झेरॉक्‍स कामावरील सुपरवायझर कडे असायला पाहिजे. 
- पाच ते दहा वर्षाची हमी असावी 
- रस्ता खराब झाल्यास लोकांनीच जाब विचारला पाहिजे 
- दर्जेदार रस्त्याचा करार करुन घेतला पाहिजे 
- रस्त्याचा दर्जा तपासणारी प्रामाणिक यंत्रणा असावी 
- कंत्राटदारांचे फोन, पत्ता असणारे फलक लावावेत 
- भ्रष्ट कंत्राटदारांना काम देवू नये 
- अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे रस्ते केले तर 20 वर्षे टिकतील 
- भ्रष्टाचारमुक्त कार्यप्रणाली अंगीकारली पाहिजे 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur police constable Yogesh Hodage heart attack death
Radhanagari dam water storage latest
Chandrakant Patil latest statement on Sharad Pawar
Hasan Mushrif hospital inspection Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com